Inauguration of various development works at Dhotre in Barshi taluka
बार्शी विशेष : बार्शी तालुक्यातील धोत्रे गावातील ४१ लाखाच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन आ. राजेंद्र राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
यामध्ये आमदार निधीतून सभामंडप बांधणे १६ लाख, जनसुविधा योजनेअंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय बांधणे १५ लाख, २५/१५ योजनेअंतर्गत गावाअंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ता करणे यासाठी १० लाख रुपये मंजूर कामांचा समावेश आहे.
धोत्रे मध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत चालू असलेल्या कामाची आ. राऊत यांनी यावेळी पाहणी केली, तसेच गणपती मंदिराचे भूमीपूजन केले.
धोत्रे गावासाठी विविध योजनांच्या माध्यमातून विकास कामे मंजूर केल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने आ. राजेंद्र राऊत यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रभाकर डमरे, काका काटे, सरपंच हेमंत जाधवर, उपसरपंच सचिन लांडे, अशोक लांडे, बाबुराव जाधवर, प्रदीप जाधवर, दादाराव जाधवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
