Krantisurya Mahatma Jyotirao Phule Meritorious Teacher Award distribution ceremony concluded
बार्शी विशेष : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मृतीदिन हाच खरा शिक्षक दिन मानून यानिमित्ताने संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आयोजित क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा बार्शीच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशउपाध्यक्ष अभिमन्यू पवार, तर प्रमुख पाहुणे म्हणून बार्शीचे तहसीलदार एफ. आर. शेख होते. विचारपीठावर धर्मराज गाडी, तुषार काशीद, रवींद्र कापसे, बाळासाहेब काकडे आणि प्रमुख व्याख्याते डॉ. संदीप तांबारे यांची उपस्थिती होती. मशाल हातात घेऊन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
सामाजिक सलोखा निर्माण करणे हे मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडने आम्हाला शिकवले आहे, तो वसा आणि वारसा आम्ही घेऊन चालणारच. शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचे फक्त नाव न घेता आम्ही त्यांच्या विचाराने कृती करत आहोत, म्हणूनच मागील १४ वर्षापासून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन, शिक्षकांनी केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक करुन त्यांना आम्ही सन्मानित करीत आहोत. सर्व महापुरुषांच्या कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर उभा रहावा म्हणून शिक्षकांनी पुढील काळात त्यांच्या विचाराने काम करण्याची गरज असल्याचे मत संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष आनंद काशीद यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
प्रमुख व्याख्याते डॉ. संदीप तांबारे यांनी, हा महाराष्ट्र पुरोगामी आहे तो महापुरुषांच्या विचाराने आणि संत परंपरेने, तोच वारसा चालवण्याची आज गरज आहे. महाराष्ट्र जातीय वादाला थारा न देणारा आहे, त्यामुळे या पुरस्कार सोहळ्यास अनन्य साधारण महत्व आहे हे उदाहरणासह या वेळी पटवून दिले.
महाराष्ट्राची प्रतिमा मलीन करण्याचे षडयंत्र सर्व राजकारणी करत आहेत, पण संभाजी ब्रिगेड ते होऊ देणार नाही. कारण विचार फक्त डोक्यात न ठेवता कृतीत जगणारे आम्ही ब्रिगेडवाले आहोत. महाराष्ट्र हा लेच्यापेच्याचा नाही, तो मातीसाठी रक्त सांडणाऱ्या योद्ध्यांचा आहे. त्यामुळे पुढील काळात सर्वांनी मर्दाचं संघटन असलेल्या संभाजी ब्रिगेडच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशउपाध्यक्ष अभिमान्यू पवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खंडू डोईफोडे यांनी केले तर मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष दत्तात्रेय दोलतडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पांडुरंग घोलप, बालाजी डोईफोडे, ईश्वर पोकळे, शंकर ठोंबरे, धनंजय गरड, विकास मगर, सोमनाथ इंगळे, सुहास उकिरडे आदींनी परिश्रम घेतले
🔴 यांना देण्यात आला पुरस्कार :
हिम्मत संजय ढेंगळे अर्णव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सासूरे फाटा, वैराग, पांडुरंग रोहिदास कांबळे (उत्कृष्ट मुख्याध्यापक) जि. प. प्राथमिक शाळा नंबर १ उपळाई ( ठोंगे), ता. बार्शी, संतोष आत्माराम जाधव (जिल्हा स्तरीय पुरस्कार) एम. एस. एस. हायस्कूल, दहिवली. ता. माढा, जि. सोलापूर, अरविंद कुंडलिक शिंदे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदणी ता. बार्शी, धनाजी कोंडीबा धिमधिमे (क्रिडा विभाग) कै. सौ. शोभाताई दिलीपराव सोपल विद्यालय घाणेगाव, ता. बार्शी, श्रीमती अंबु शिवलिंग गुळवे, स्व. सौ. शोभाताई सोपल विद्यामंदिर सौंदरे, श्रीमती आशा अच्युतराव कुंभार, श्रीपतपिंपरी जि.प. शाळा, ता. बार्शी, शहाजी भाऊराव पाटील, सहारा प्राथमिक आश्रम शाळा, आष्टा (कासार) ता. लोहारा जि. धाराशिव, तानाजी दत्तात्रय कांदे कर्मवीर उमा विद्यालय चारे, ता. बार्शी, श्रीमती शितल बाबुराव सुरवसे, जि. प. प्रा. शाळा तांदुळवाडी, ता. बार्शी, श्रीमती आशा नवनाथ जंगले, जि. प. प्रा. शाळा मांडेगाव ता. बार्शी, श्रीमती अनिता विष्णू भोसले, जि. प. प्रा. शाळा घाणेगाव ता. बार्शी, सज्जनराव आप्पाराव जगदाळे, जि. प. प्रा. शा. धोत्रे ता. बार्शी, शशिकांत महादेव लांडगे, महाराष्ट्र विद्यालय, बार्शी (कला विभाग), शंकर रामचंद्र आगलावे, कर्मवीर ना.मा. गडसिंग (गुरुजी) मित्र विद्यालय मळेगाव. ता. बार्शी, योगेश सुभाष उपळकर, महाराष्ट्र विद्यालय बार्शी, योगेश भारत पाटील, एन. के. ऑर्किड अभियांत्रिकी कॉलेज, सोलापूर (अभियांत्रिकी विभाग), नवनाथ विष्णू काकडे, श्री बळवंतराव घाटे प्रशाला, यावली, ता. बार्शी, तानाजी धनंजय आगलावे, जि. प. प्रा. शाळा महागांव, ता. बार्शी, अनिल रमेश वैद्य वखारिया विद्यालय, उपळे दुमाला, ता. बार्शी, प्रा. डॉ. मीनाक्षी प्रल्हादराव शिंदे (कनिष्ठ महाविद्यालय विभाग) सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कळंब, ता. धाराशिव, बाबासाहेब बापू चौरे (राज्यस्तरीय पुरस्कार) जि. प. प्रा. शाळा, भुहीर ता. पाडा जि. पालघर, जि. प. प्राथमिक शाळा कव्हे, ता. बार्शी, (मुख्याध्यापक व शिक्षक वृंद) स्व. शोभाताई सोपल सेमी इंग्लिश स्कूल, पांगरी, ता. बार्शी (मुख्याध्यापक व शिक्षक कर्मचारी वृंद) श्रीमती विमल गणपत वाघमारे (अंगणवाडी सेविका) घाणेगाव, ता. बार्शी.
