Keeping the status about Deputy Chief Minister Ajit Pawar is expensive; A case has been registered in Barshi
बार्शी विशेष : सोशल मिडीयाचा वापर करताना रहा सावधान, नाहीतर मोबाईलवर ठेवलेले एखादे स्टेटस सुध्दा महागात पडू शकते. कारण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेबद्दल अवमानकारक स्टेटस ठेवणाऱ्या अकोला येथील एका व्यक्तीवर बार्शी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गौरव गजानन डोंगरे रा. आनंद वाटीका, वाशिम बायपास, अकोला याने स्वतःचे मोबाईलवर 'तो अजित पवार काय डोक्यावर पडला काय? त्याच्या घरात पी. एच. डी करणारे कोणी पैदा नाही झाले म्हणून तो दिवे लावयची भाषा करतो. पार्श्वभागावर दिवे लावू तुम्हाला. म्हणून सर्वोच सभागहात औकातीत बोलावे. दहावी फेल मानसा' असे स्टेटस ठेवले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत अवमानकारक स्टेटस ठेवून सार्वजनिक शांतता भंग करण्याचा उद्देशाने अपमान केला आहे, अशी तक्रार दशरथ जरिचंद्र सोनवणे (वय ३१) रा. इंदापूर ता. बार्शी यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यावरुन अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास पोहेकॉ वाघमोडे करत आहेत.
