मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बार्शी पोलिसांची बाटलीमधून पेट्रोल देण्यास मनाई

Admin
0

 

Barshi police ban petrol from bottles in wake of Maratha agitation

Barshi police ban petrol from bottles in wake of Maratha agitation

बार्शी विशेष : सध्या राज्यात मराठा तसेच इतर समाजांच्यावतीने आरक्षण मागणी संदर्भात आंदोलने सुरु असून, आंदोलन हिंसक झाल्यास टायर पेटविण्यासाठी पेट्रोल, डिझेल यांचा वापर केला जाऊ शकतो. 

यासाठी पूर्व खबरदारीचा उपाय म्हणून बार्शी शहर पोलिसांनी पेट्रोल पंप चालकांना फौजदारी प्रक्रिया दड संहिता १९७३ कलम १४९ व महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे ३६ मधील पोटकलम अ ते फ अन्वये कोणत्याही व्यक्तीला बाटलीमध्ये पेट्रोल, डिझेल देवू नये अशा आशयाच्या नोटीस बजावल्या आहेत. 

तसेच नोटीस देऊनही बाटलीमध्ये इंधन दिल्याचे निदर्शनास आल्यास व त्यामधून काही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)