बँकेच्या हितसंबंधाच्या दृष्टीने भाकरी फिरविणे अत्यंत गरजेचे : माजी खा. शिवाजी कांबळे

Admin
0

 

In terms of the interest of the bank, it is very important to rotate the bread: Ex-MP Shivaji Kamble

In terms of the interest of the bank, it is very important to rotate the bread: Ex-MP Shivaji Kamble


बार्शी विशेष : बँकेच्या हितसंबंधाच्या दृष्टीने भाकरी फिरविणे अत्यंत गरजेचे आहे असे मत शिवशक्ती अर्बन को. ऑप. बँक लि. बार्शी चे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार शिवाजी कांबळे आणि स्थापनेपासून संचालक म्हणून कार्यरत असलेले एन. बी. सोलवट यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले. कोणत्याही एका पॅनेलचे समर्थन करणे हा या पत्रकार परिषदेचा उद्देश नाही, तर बँक संचालक मंडळाच्या निवडणूकीत प्रचारासाठी येणाऱ्या उमेदवारांना सर्व मतदार ठेवीदारांनी प्रश्न विचारुन बँकेची वास्तविक स्थिती काय आहे ती समजून घ्यावी आणि विचारपूर्वक मतदान करावे, याबाबत आवाहन करणे आहे असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांनी समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक उद्धारासाठी खेडोपाड्यात शैक्षणिक संस्था, व्यापारी संस्था, मुद्रण व्यवसाय याप्रकारे केलेले कार्य सर्वज्ञात आहे. त्याचबरोबर संस्थेची एक बँक असावी हे त्यांचे स्वप्न होते. त्याचवेळी तत्कालीन खासदार शिवाजी कांबळे यांची बँक स्थापन करण्याची प्रक्रिया चालू होती. संस्थेची बँक असावी ही मामांची इच्छा आहे हे समजल्यानंतर श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाशी संपर्क साधून कांबळे यांनी स्वतःची बँक स्थापनेची प्रक्रिया आहे त्या स्थितीत संस्थेस दिली. मामांच्या आशिर्वादाने व संस्थेतील सर्व पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या योगदानाने ३१ डिसेंबर १९९९ रोजी मामांचे स्वप्न साकार होऊन बँकेची नोंदणी झाली. अशी बँक स्थापनेबाबतची आठवण त्यांनी सांगितली. 

______________________________________________________

   ◾काही ठळक मुद्दे

  • बँकेच्या नविन इमारत बांधकामात भ्रष्टाचार झाला
  • कर्ज देताना अनियमितता केली गेली
  • कर्ज परतफेडीची क्षमता तपासली गेली नाही
  • बँक एनपी नाही हे दाखविण्यासाठी गैरप्रकार केले गेले
  • संचालकाच्या नातेवाईकांना लाभ मिळू नये या संकेताचे उल्लंघन केले गेले
  • निवडणूकीपूर्वी केलेल्या समन्वयाच्या प्रयत्नाला विद्यमान संचालकांचा नकार
  • महादेवाला लागेल म्हणून पिंडीवर बसलेला विंचू ठेचता येत नाही
  • भाकरी फिरविण्याची वेळ आता आली आहे
  • आम्ही जन्माला घातलेले हे अपत्य आहे सांगताना सोलवट भावनाविवश 
______________________________________________________


सद्यस्थितीत या बँकेच्या संचालक मंडळ निवडीची प्रक्रिया चालू झाली आहे. तेव्हा प्रचारासाठी येणाऱ्या उमेदवारांकडे मतदारांनी,

१) प्रस्थापित पॅनेलमधील काही संचालकांवर सहकार क्षेत्राच्या चौकश्या समित्या नियुक्त होऊन त्यात ते दोषी आढळलेले आहेत. 
२) प्रस्थापित संचालक मंडळातील बरेचसे संचालक संचालक मंडळाच्या मिटींगला हजर न राहता केवळ सह्या करताना दिसून आलेले आहेत. अशा संचालकांचे संचालक पदही तत्कालीन चेअरमन यांनी रद्द केले होते. प्रस्तुत निवडणुकीमध्ये असेच काही उमेदवार निवडणुकीस उभे राहिलेले आहेत, त्यांना आपण निवडून देणार का ?
३) सभासद ठेवी, कर्जवितरण व व्यवस्थापन खर्च  हे रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे पाळली गेलेली दिसून येत नाही. याचा स्पष्ट अर्थ होतो की, बँक टप्प्याटप्प्याने धोक्याच्या पातळीकडे वाटचाल करत आहे हे स्पष्ट आहे. 
४) प्रस्थापित काही स्वतःचा व्यवसाय सोडून सेवाभावी वृत्तीचा आव आणून सहकार क्षेत्रात शिरलेले दिसतात. 
५) समाजहिताच्या दृष्टीने व बँकेच्या दृष्टीने अशी स्थिती असेल तर मतदाराने विचार करणे अत्यंत महत्वाचे आहे. 
६) सहकार क्षेत्रात अशा स्थितीत निवडणूकीत संचालक मंडळाचा बदल करणे अनिवार्य आहे. 
७) एकतर्फी बँक चालवणे हे सभासदांच्या व ठेवीदारांच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. 
८) बँकेच्या अनियमिततेबद्दल रिझर्व बँकेने बँकेस एकदा दंड केलेला आहे. 
९) सर्व प्रकारच्या कर्ज वितरणामध्ये व्याजदर कमीजास्त करताना प्रस्थापित संचालक मंडळाने सभासद ठेवींचा संरक्षणाच्या दृष्टीने विचार केलेला दिसून येत नाही, शिवाय कर्जवितरणातील प्रक्रिया फी अवास्तव असून त्याचा हिशोब कोठेही दिसून येत नाही. 

या प्रश्नोत्तर रूपाने बँकेची वास्तव स्थिती समजून घेऊन विचारपूर्वक मतदान करावे. कोणतीही सहकारी संस्था कार्यरत असते तेव्हा जागृतपणे क्रियाशील आहे का याचा अभ्यास करुन मतदार सभासद योग्य निर्णय घेतील अशी आम्ही आशा बाळगतो, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)