Woman's Diwali happy after finding gold nugget; Performance of Barshi City Police
बार्शी विशेष : दिवाळी सणासाठी गावाकडे निघालेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून पळालेल्या चोरास तत्परतेने अटक करुन त्याचेकडून सोन्याचे गंठण हस्तगत करण्यात बार्शी शहर पोलिसांना यश आले आहे. शंकर सायबु जाधव रा. मंगरूळ ता. घनसावंगी जि. जालना असे अटक केलेल्या चोराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलभा कविश्वर सांगळे (रा. मुळ गाव निजाम जवळा ता. भूम जि. धाराशिव) हल्ली रा. जरगनगर, कोल्हापूर या दिवाळी सणासाठी वालवड येथे जाण्याकरीता, कोल्हापूर येथून बार्शी बस स्थानकावर आल्या होत्या. बस स्थानकात असलेल्या मेडिकल दुकानासमोरुन पाथरुड बसकडे त्या बॅग घेऊन जात असताना, एका तरुणाने अचानकपणे धक्का देऊन विरोधाला न जुमानता, त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून बस बाहेर पडतात त्या गेटमधून पळ काढला.
ही घटना दि. १० नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी साडेचारचे सुमारास घडली. सुलभा सांगळे यांनी नव्वद हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण चोरीला गेल्याची फिर्याद शहर पोलिस ठाण्यात देताच, पो. नि. संतोष गिरीगोसावी यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेस गुन्ह्याच्या तपास करण्याबाबत सूचना दिल्या.
गुन्ह्यात वर्णन केल्याप्रमाणे एक व्यक्ती शिवाजी कॉलेज परिसरात संशयीतरित्या फिरत असल्याची माहिती तपास करत असताना पोलिसांना मिळाताच, बार्शी शहर गुन्हे शाखेचे सपोनि ढेरे,पोसई गळगटे, पोहेकॉ अमोल माने, पोकॉ पवार, पोकॉ उदार यांनी त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने त्याचे नाव शंकर सायबु जाधव, (रा. सुमित्रानगर यशवंतनगर, अकलूज ता. माळशिरस) हल्ली रा. मंगरूळ ता. घनसावंगी जि. जालना असल्याचे सांगितले. त्याच्या अंग झडतीमध्ये चोरलेले सोन्याचे गंठण मिळून आल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
सदरची कामगिरी पो. अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पो. अधिक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पो. अधिकारी जालिंदर नालकुल यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. संतोष गिरीगोसावी, सपोनि दिलीप ढेरे, पोसई महेश गळगटे, सपोफौ अजित वरपे, पोहेकॉ रेवणनाथ भोंग, पोहेकॉ अमोल माने, पोना मनिष पवार, पोना वैभव ठेंगल, पोकॉ अविनाश पवार, पोकॉ राहुल उदार, पोकॉ ज्ञानेश्वर घोंगडे, पोकॉ अर्जुन गोसावी, पोकॉ सचिन देशमुख, पोकॉ मोहन कदम, पोकॉ रवि लगदिवे, पोकॉ अंकुश जाधव, पोकॉ रोहित बागल, पोकॉ इस्माईल बहिरे, पोका रामेश्वर मस्के यांनी बजावली.
