बार्शीतील राजवाडा हॉटेलला भीषण आग

Admin
0

The Rajwada Hotel in Barshi was on fire


बार्शी विशेष : बार्शीतील शिवाजी महाविद्यालय मार्गावर असलेल्या राजवाडा हॉटेलला रविवारी रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. रविवार दिनांक १२ नोव्हेंबर २०२३ च्या रात्री ही दुर्घटना घडली.


बघता बघता या आगीने रौद्र रूप धारण केले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग लागण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)