दर्शनरांगेतील भाविकांना अत्याधुनिक सुविधा देण्याचे नियोजन : गहिनीनाथ महाराज औसेकर

Admin
0

 

Planning to provide modern facilities to the devotees in the darshan queue: Gahininath Maharaj Ausekar

Planning to provide modern facilities to the devotees in the darshan queue: Gahininath Maharaj Ausekar

बार्शी विशेष (पंढरपूर) : यंदाची कार्तिकी यात्रा १४ ते २७ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत संपन्न होत आहे. त्यामध्ये २३ नोव्हेंबर रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून, यात्रेला येणा-या भाविकांना, आषाढी यात्रेप्रमाणेच पुरेशा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामध्ये दर्शनरांगेत स्कायवॉकवर आपत्कालिन दरवाजे, शौचालयांची व्यवस्था, लाईव्ह दर्शन, प्रत्येक ५० मीटर अंतरावर पर्यवेक्षकांची नियुक्ती, सार्वजनिक सूचना प्रणाली, बसण्याची सुविधा, मोफत खिचडी, चहा व मिनरल वॉटर वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सहअध्यक्ष श्री. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. 


मंदिर समितीची बैठक दि. ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता सहअध्यक्ष श्री. गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज (औसेकर) यांचे अध्यक्षतेखाली श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास, पंढरपूर येथे संपन्न झाली. सदर बैठकीस सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, श्री. संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), ह.भ.प. शिवाजीराव मोरे तसेच कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र शेळके व व्यवस्थापक श्री बालाजी पुदलवाड उपस्थित होते. तर श्री. भास्करगिरी बाबा, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ हे दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.


Planning to provide modern facilities to the devotees in the darshan queue: Gahininath Maharaj Ausekar


यात्रा कालावधीत मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन

मंदिर समितीच्या कर्मचा-यांना कार्तिकी यात्रेच्या अनुषंगाने ज्ञानदा फाऊंडेशन, पुणे यांचेमार्फत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देणे, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती पंढरपूर, पालकमंत्री श्री. चंद्रकांत पाटील, समर्थ युवा फाऊंडेशन व कैवल्य वेलफेअर फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कार्तिकी यात्रा कालावधीत मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. भाविकांना पुरेशा प्रमाणात बुंदी लाडूप्रसाद उपलब्ध करून देण्यासाठी जादा स्टॉल उभारण्यात येणार आहेत. 

प्राधान्यक्रमाने विकास आराखड्याच्या कामास सुरूवात

याशिवाय, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दि. २३ मे २०२३ रोजी पार पडलेल्या शिखर समितीच्या बैठकीत रुपये ७३८५.९५ लक्ष किंमतीच्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर संवर्धन विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली होती. या आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामांची पुरातत्व विभागामार्फत ई निविदा राबविण्यात आली होती. त्यामध्ये सवानी हेरीटेज कॉन्झर्वेशन प्रा. लि., मुंबई यांची ई निविदा (रू. २७,४४,११,७६५) मंजूर करण्यात आली आहे. सदर कामाचा प्राधान्यक्रम ठरवून लवकरच कामास सुरूवात करण्यात येत आहे. यामध्ये मुख्य मंदिर व संकुलातील मंदिराचे जतन, संवर्धन, मुख्य विठ्ठल मंदिर (गर्भगृह, चारखांबो, सोळखांबो, अर्धमंडप इ.), रुक्मिणी मंदिर, नामदेव पायरी व त्यावरील इमारतीचे नुतनीकरण, महाद्वार व दोन्ही बाजूंच्या पडसाळी ५, महालक्ष्मी मंदिर, व्यंकटेश मंदिर, मंदिरातील इतर इमारती (बाजीराव पडसाळ, पश्चिम दरवाजा तसेच मंदिरातील ३८ परिवार देवता, काशी विश्वेश्वर, शनैश्वर, खंडोबा, गणपती, राम मंदिर वगैरे) मंदिरातील दीपमाला इत्यादी कामे प्रस्तावित असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी श्री. राजेंद्र शेळके यांनी दिली.



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)