बार्शीमध्ये कुणबी प्रमाणपत्रांच्या वितरणास सुरूवात

Admin
0

 

Distribution of Kunbi caste certificates started in Barshi

Distribution of Kunbi caste certificates started in Barshi


बार्शी विशेष : कुणबी जात प्रमाणपत्रांच्या वितरणास बार्शीमध्ये सुरुवात झाली. सोमवार दि. १३ नोव्हेंबर रोजी बार्शी तहसिल कार्यालयात आयोजित एका कार्यक्रमात आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते पाटील, डोईफोडे आदींना प्रातिनिधीक स्वरुपात चार प्रमाणपत्रे देण्यात आली.


कुणबी नोंद शोध मोहिमेत आत्तापर्यंत महसूल विभागाकडे १७०० हून अधिक तर बार्शी नगरपरिषदेकडे १९०० हून अधिक नोंदी आढळून आल्या आहेत. अजूनही नोंदी तपासण्याचे काम सुरु आहे. आधीच्या पिढीतील पूर्वजापासून नोंदी असल्यामुळे कुटुंबातील जेष्ठ व्यक्तींकडून यासंदर्भात माहिती घेऊन लोकांनी अर्ज करावेत असे आवाहन आ. राजेंद्र राऊत यांनी याप्रसंगी बोलताना केले. दिवाळीची सुट्टी असूनही महसूल खात्यातील कर्मचारी, शिक्षक आदी कर्मचाऱ्यांनी या काळात नोंदी तपासण्याचे काम केल्याचा आवर्जून उल्लेख करुन आ. राऊत यांनी त्यांचे विशेष आभार मानले.


मागील काही दिवसांपासून महसूल विभागाने केलेल्या तपासणीत आत्तापर्यंत १७७३ कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. ज्या गावातील नोंदी सापडल्या आहेत, तेथील तलाठी आणि ग्रामसेवक यांच्याकडून त्या नोंदी प्रमाणित करुन दाखले वितरीत करण्यासाठी पुढील आठवड्यापासून त्या ठिकाणी शिबीरे घेण्यात येतील, अशी माहिती यावेळी बोलताना तहसीलदार एफ. आर. शेख यांनी दिली.


यावेळी उपजिल्हाधिकारी संचेती मॅडम, तहसीलदार शेख, संजीवन मुंडे, मा. नगराध्यक्ष रमेश पाटील, मा. नगरसेवक मदन गव्हाणे, दिपक राऊत, भारत पवार, अजय पाटील व सकल मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)