Bike rider killed in Barshi collision with tempo
बार्शी विशेष : बार्शी धाराशिव रस्त्यावर दुचाकी आणि टेंपोची धडक होऊन झालेल्या अपघातात, दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यु झाला. ही घटना दि. ५ नोव्हेंबर रोजी रात्री सव्वा आठचे सुमारास घडली. राहुल लक्ष्मण शिंदे (वय ३२), रा. ढगे मळा, बार्शी असे मृत्यु पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून, त्याच्या भावाने बार्शी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बार्शीतील राहुल शिंदे दि. ५ नोव्हेंबर रोजी दुचाकीवरुन (क्र. एमएच-१२-जीएच-५३७१) बार्शीहून शेलगावकडे जात असताना, रात्री सव्वा आठचे सुमारास बार्शी धाराशिव रस्त्यावर दर्शना सोयाबीन मिलजवळ समोरुन येणारा आयशर टेंपो (क्र. एमएच-२५-एजे-५५५१) आणि दुचाकी यांची धडक झाल्याने गंभीर जखमी झाला. रुग्णवाहिकेतून त्याला बार्शीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी मयत झाल्याचे सांगितले.
या घटनेची फिर्याद मृत व्यक्तीचा भाऊ अंबादास लक्ष्मण शिंदे (वय ३१) रा. धारुरकर बोळ, बार्शी याने बार्शी तालुका पोलिस ठाण्यात दिली असून, अनोळखी टेंपोचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
