![]() |
| गुळपोळी येथे महामानवाला अभिवादन |
बार्शी विशेष : गुळपोळी येथील महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनिल चौधरी आणि प्रमुख पाहुणे नानासाहेब श्रीमंत शिंदे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. यावेळी सचिन चौधरी, समाधान चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा संदेश देऊन बाबासाहेबानी सर्व घटकासाठी कार्य केले, आपल्या देशाला राज्यघटना दिली. आजच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. भीम जयंती ही विचारांची साजरी झाली पाहिजे, असे विचार संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ चौधरी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
याप्रसंगी विविध मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले. महापुरुषांचे पुस्तक आणि गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
संस्थेचे पदाधिकारी, किरण खुरंगळे, सुमित माळी, अधिरा चौधरी, दिपाली चौधरी, रंजना खुरंगळे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रस्तावना भैरवनाथ चौधरी यांनी तर सूत्रसंचालन व अभारप्रदर्शन किरण खुरंगळे यांनी केले.

