Knife stabbing of youth due to dispute over borrowed money
बार्शी विशेष : वडिलांनी उसने घेतलेले पैसे परत मागण्याच्या कारणावरुन झालेल्या वादात युवकाच्या दंडावर चाकूने मारुन जखमी केल्याची घटना बार्शीतील बाळेश्वर नाक्यावर घडली. अभिजीत ज्ञानेश्वर खुने (वय २२) रा. ढगे मळा, बार्शी याने याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे.
दाखल फिर्यादीनुसार, बार्शीतील बाळेश्वर नाका येथे फिर्यादीचे चहा कँटीन असून, तो तेथे बसला असताना त्याच्या ओळखीचा सचिन शिंदे तेथे आला आणि तुझ्या वडिलांनी माझ्याकडून उसने घेतेलेले चौदा हजार रुपये परत दे अशी मागणी करु लागला. त्यावर माझ्या वडिलांचे दोन वर्षापूर्वी निधन झाले असून, त्यांनी पैसे घेतले का नाही ते मला माहित नाही असे फिर्यादी म्हणताच, झालेल्या वादातून शिंदेने शिवीगाळी करत खिशातील चाकू काढून फिर्यादीच्या दंडावर मारुन जखमी केले व निघून गेला. ही घटना दि. ३ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. पुढील तपास पोहेकॉ शेख करत आहेत.
