पैशाच्या कारणावरुन बार्शीत तरुणाला मारहाण

Admin
0

A youth was beaten up in Barshi asking when he would pay the money

पैशाच्या कारणावरुन बार्शीत तरुणाला मारहाण | A youth was beaten up in Barshi asking when he would pay the money

बार्शी विशेष : पैसे कधी देणार या कारणावरुन एका तरुणाला मारहाण झाल्याची घटना बार्शीत घडली. औदुंबर कालिदास शेळके (वय ३१) रा. ममदापूर, ता. बार्शी असे त्या तरुणाचे नाव आहे. ही घटना दि. ५ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी चारचे सुमारास उपळाई रोड, परांडा चौकात घडली.

माझ्या एका मित्राला तुकाई देवी मंदिराजवळ सोडून मी उपळाई रोड, परांडा चौकात थांबलो असताना, प्रदीप बोराडे हा भावासह तेथे आला आणि माझे पैसे कधी देणार असे मला विचारु लागला. त्यावेळी मी तुला याआधी पैसे दिलेले आहेत, आत्ता माझ्याकडे पैसे नाहीत, आल्यानंतर देतो असे मी म्हणालो. त्यावरुन वाद होऊन बोराडे बंधूंनी मला शिवीगाळी करत मारहाण केली, आणि फरशीचा तुकडा माझ्या डाव्या मनगटावर मारला. अशी फिर्याद औदुंबर शेळके याने बार्शी शहर पोलिसात दिली. त्यावरुन पोलिसांनी प्रदीप बोराडे व शुभम बोराडे (रा. उपळाई रोड, बार्शी) यांचेविरुध्द गुन्हा नोंद केला आहे. 



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)