A blade struck the arm for a minor reason; the incident in Barshi
बार्शी विशेष : एका महिलेशी का बोलतो या कारणावरुन हातावर ब्लेड मारल्याचा प्रकार बार्शीतील तेलगिरणी चौकात घडला.
दाखल फिर्यादीनुसार, बार्शीतील तेलगिरणी चौकात माझ्या चुलत भावासोबत मी बोलत थांबलो असताना, विजय चव्हाण, रा. आशा टॉकीज, बार्शी तिथे आला आणि तू ओळखीच्या एका महिलेशी का बोलतो, तुझा तिला बोलण्याचा काय संबंध असे म्हणून निघून गेला, नंतर चुलत भाऊ पण निघून गेला. त्यानंतर तिथे मी एकटा थांबलो असताना थोड्याच वेळात चव्हाण परत आला व मला शिवीगाळी करुन माझ्या डाव्या हातावर ब्लेडने मारले, अशी फिर्याद गणेश बापू रगडे (वय २४) रा. उपळाई ठोंगे, रगडे वस्ती, ता. बार्शी याने बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली. ही घटना दि. ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणे सहाचे सुमारास घडली. अधिक तपास सपोफौ शेटे करत आहेत.
