बार्शीच्या भवानी पेठेतून मोटरसायकलची चोरी

Admin
0

 

Theft of a motorcycle from Bhawani Peth in Barshi

बार्शी विशेष : शहरातील भवानी पेठेतून राहत्या घरासमोर लावलेली मोटरसायकल चोरीस गेल्याची घटना घडली.

महेश दयानंद परदेशी (वय २७) रा. भवानी पेठ, भवानी मंदिराजवळ, बार्शी यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली असून, राहत्या घरासमोर हँडल लॉक लाऊन उभी केलेली काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस मोटरसायकल (क्र. एमएच-१३-डीजे-२१७९)  दि. १७ ऑक्टोबर च्या सायंकाळी ७.३० ते १८ ऑक्टोबर २०२३ च्या सकाळी ७ चे दरम्यान कुणीतरी चोरून नेल्याचे दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.

बार्शी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल झाला असून, सदर गुन्ह्याचा तपास पोना. ठेंगल करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)