मनोज जरांगे पाटील यांच्या बार्शीतील सभेची जय्यत तयारी

Admin
0

 

Successful preparations for Manoj Jarange Patil's Barshi meeting

बार्शी विशेष : मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांचे शुक्रवार दि. ६ ऑक्टोबर रोजी आगमन होत असून त्यांच्या स्वागताची आणि जाहीर सभेची जय्यत तयारी करण्यात आल्याची माहिती सकल मराठा समाजाच्यावतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

सभेला बार्शी तालुक्यातून येणारे लोक आणि वाहने यांची संख्या लक्षात घेऊन करण्यात आलेले सभेचे नियोजन, वाहनतळ व्यवस्था, महिलांची बैठक व्यवस्था याविषयी माहिती देण्यात आली. तसेच या सभेला मराठा समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही करण्यात आले.

या पत्रकार परिषदेस सकल मराठा समाज समन्वयक समितीचे सदस्य उपस्थित होते.


  • कुर्डुवाडी येथून होणार बार्शीत आगमन
  • तलवार, मावळा पगडी, भगवी शाल, सन्मानपत्र देऊन केला जाणार सत्कार
  • महिलांना बसण्याची स्वतंत्र व्यवस्था आणि महिला स्वयंसेविका
  • सुमारे एक हजार स्वयंसेवकांचा सहभाग
  • अनेक समाजबांधवाांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग
  • विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता

 

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आमरण उपोषण करणाऱ्या बार्शी तालुक्यातील एकमेव महिला उपोषकर्त्या वैशाली आवारे या सकल मराठा समाजाच्यावतीने प्रातिनिधीक स्वरुपात मंचावर जाऊन मनोज जरांगे पाटील यांचा सत्कार करतील.


अशी असेल वाहनतळ व्यवस्था

तालुक्यातील विविध भागातून सभेला येणाऱ्या वाहनांसाठी त्यांच्या भागासाठी सोईस्कर ठरेल अशा कासारवाडी रस्ता, लाकूडतळ, शिवशक्ती मैदान, मंगळवार पेठ, परांडा रस्ता, उपळाई रस्ता, अलिपूर रस्ता या ठिकाणी वाहने थांबविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)