राज्यातील डिजिटल मिडियाला शासकीय जाहिराती द्याव्यात : राजा माने

Admin
0

 

Digital media in the state should be given government advertisements: Raja Mane

बार्शी विशेष (मुंबई) : डिजिटल मिडियाला शासकीय जाहिराती देण्यासंदर्भात राजस्थान सरकारने अलिकडेच एक अध्यादेश जारी केला आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील डिजिटल मिडिया प्लॅटफॉर्म्ससाठी धोरण ठरवून शासकीय जाहिराती देण्यात याव्यात अशी मागणी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदें, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालकांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

केंद्र सरकारच्या डिजिटल मिडियासह राज्यातील रेडिओ व इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या आस्थापनांना श्रमिक पत्रकार कक्षेत घेण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिल्याबद्दल राज्यातील डिजिटल मिडियाच्यावतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्रीमंडळाचे राजा माने यांनी आभार मानले. 

राजस्थान सरकारने राज्यातील डिजिटल मिडियाला शासकीय जाहिराती देण्यासाठी धोरण ठरवून दि.२६ जून २०२३ रोजी एक अध्यादेश जारी केला आहे. त्यानुसार फेसबुक, युट्यूब आदी डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्मच्या फॉलोअर्स व सबस्क्राईबर्सच्या संख्येची १० लाखांपासून १० हजारापर्यंत अ, ब, क, ड अशी वर्गवारी करुन व नियम, निकष व अटी निश्चित करुन शासकीय जाहिराती देण्याचा निर्णय घेतला आहे. 

महाराष्ट्रातील महानगरांपासून ते ग्रामीण महाराष्ट्रातील वाड्या-वस्त्यांपर्यंत पोहोचलेल्या डिजिटल मिडियाच्या विकासासाठी व शिस्त लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राजस्थान शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील डिजिटल मिडियाला शासकीय जाहिराती तातडीने सुरु कराव्यात अशी मागणी राजा माने यांनी या निवेदनात केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)