बार्शी शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे दोन अल्पवयीन मुले पालकांच्या स्वाधीन

Admin
0

 

Two minor children were handed over to their parents due to the vigilance of the Barshi city police

बार्शी विशेष : आई वडीलांसोबत भांडण झाल्यामुळे रागाच्या भरात घर सोडून बाहेर पडलेली दोन अल्पवयीन मुले बार्शी शहर पोलिसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे सुखरुपपणे पालकांच्या ताब्यात मिळाली.

याबाबतची अधिक माहिती अशी की,  बार्शी शहर बस स्थानकावर दोन अल्पवयीन मुले फिरत असल्याबाबतची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार बार्शी शहर पोलीस ठाण्यातील अंमलदार पो.ना. अमोल माने, सचिन देशमुख, अविरत बरबडे यांनी बस स्थानकात जाऊन चौकशी केली असता, त्यांना सदर दोन अल्पवयीन मुले तेथे दिसून आली. 

त्या मुलांना विश्वासात घेऊन धीर देत त्यांच्याकडे विचारपूस केली असता, त्यांनी त्यांची नावे सार्थक समाधान सरवदे (वय ११) व सोहम विशाल मिरवणे (वय ८) दोघेही रा.तेरखेडा, जि. धाराशिव असल्याचे सांगितले. तसेच आई वडीलांसोबत भांडण झाल्याच्या कारणामुळे रागाच्या भरात कोणालाही काही न सांगता सकाळी तेरखेडा येथून पुण्यास जाण्यासाठी बाहेर पडल्याचे सांगितले.

Two minor children were handed over to their parents due to the vigilance of the Barshi city police

पोलिसांनी त्यांना बालस्नेही कक्षामध्ये आणल्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, सपोनि ज्ञानेश्वर उदार यांनी त्यांचे समुपदेशन केले, तेव्हा त्यांनी यापुढे आम्ही आई वडीलांना न सांगता कोठेही बाहेरगावी जाणार नाही असे सांगितले. सदर मुलांच्या पालकांशी संपर्क साधून त्यांना बार्शी येथे बोलावून घेऊन शहर पोलिसांनी त्या दोघांना सुरक्षितपणे पालकांच्या स्वाधीन केले. 

Two minor children were handed over to their parents due to the vigilance of the Barshi city police

पालकांपासून दुरावले जाण्याआधीच ही मुले पोलिसांनी दाखविलेल्या सतर्कतेने व समयसूचकतेने वेळीच पालकांच्या स्वाधीन झाल्यामुळे बार्शी शहर पोलिसांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)