जय भगवंत ढोल-ताशा, ध्वज पथकाकडून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य संचाचे वाटप

Admin
0

Jai Bhagwant Dhol-Tasha Team distributes sets of school materials to needy students

 

बार्शी विशेष : बार्शीतील जय भगवंत ढोल-ताशा, ध्वज पथकाने १०० गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य संचाचे वाटप करुन सामाजिक भान जपले आहे.

बार्शी नगरपरिषद शाळा क्र. ५ मध्ये क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून या उपक्रमास सुरुवात करण्यात आली. शहरातील नगरपरिषद शाळा क्र. ५, साधना कन्या प्रशाला, सुलाखे हायस्कूल, मॉडेल हायस्कूल, कन्या प्रशाला, न्यू हायस्कूल, टेक्निकल हायस्कूल तसेच इतर काही शाळेतील एकूण १०० गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे संच देण्यात आले. या संचात स्कूल बॅग, २०० पानांच्या ५ वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, पट्टी, पॅड व पाणी बाटली चा समावेश होता.

जय भगवंतच्या वतीने सामाजिक भान जपत विविध उपक्रम राबविले जातात. शिक्षण साहित्यापासून विद्यार्थी वंचित राहू नयेत या हेतूने मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी जय भगवंत ढोल-ताशा, ध्वज पथकाच्या वतीने शालेय साहित्य संचाचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमासाठी सर्व शाळांचे मुख्याध्यापक स्वामीराव हिरोळीकर, विक्रम टकले, नागनाथ देवकते, प्रज्ञा वाघमारे, विनिता काळे, शोभा संचेती, बुचडे तसेच शिक्षक रामचंद्र इकारे, प्रताप दराडे, सूर्यकांत चोरमुले, धनाजी सोनटक्के, समीर वायकुळे, प्रसन्न देशपांडे यांनी सहकार्य केले.

यावेळी पथकाचे अध्यक्ष उमेश काळे, पथक प्रमुख हर्षद लोहार, प्रविण परदेशी, अविनाश बोकफोडे, अप्पासाहेब घबाडे, विजय कदम, गणेश ढगे, अक्षय काजळे, रणदिवे, अबोली पालके, अतिश पालके, अंकिता बारंगुळे, ज्ञानेश्वरी गुमटे, संतोष चव्हाण, आकाश तिकटे, अमित मिसाळ, प्रविण पावले व पथकातील सदस्य उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)