सिल्हर ज्युबिली व सरस्वती प्राथमिक विद्यामंदीरात विद्यार्थ्यांचे तोंड गोड करुन स्वागत

Admin
0

 

A warm welcome to students at Silver Jubilee and Saraswati Primary School

बार्शी विशेष : येथील सिल्हर ज्युबिली प्राथमिक शाळा व सरस्वती प्राथमिक विद्यामंदीर या दोन्ही शाळेत, १ ली च्या विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी गुलाब पुष्प, फुगे देऊन तसेच शिरा देऊन तोंड गोड करुन स्वागत करण्यात आले.  

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन अॅड. रणवीर राऊत यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक संदेश काकडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांना अध्यक्षांच्या व पाहुण्यांच्या हस्ते पाठ्यपुस्तक व गुलाबपुष्प देण्यात आले. 

सिल्व्हर ज्युबिली प्राथमिक शाळेच्या सौ. जयश्री रणखांबे यांनी प्रास्ताविक व अध्यक्षांचा सत्कार केला, तर सरस्वती प्राथमिक विद्यामंदिरच्या सौ. रेणूका धुळम यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मेघा जाधव यांनी केले. तर  सौ. उषा कानडे यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी सि. ज्यु. प्रा. शाळेच्या सौ. बबिता जमदाडे, अमोगसिद्ध तेली, सरस्वती प्राथमिक विद्या मंदिरचे धेनुकरण स्वामी सर उपस्थित होते.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)