बार्शी पोलिसांच्या नाकाबंदीत दरोड्याच्या साहित्यासह सहा जणांची टोळी सापडली

Admin
0

 

Barshi police found a gang of six people along with robbery materials in the blockade

बार्शी विशेष : बार्शी शहर पोलिसांनी लावलेल्या नाकाबंदी दरम्यान दरोडा टाकण्याच्या उद्देशाने चारचाकी वाहनातून निघालेली सहा संशयित आरोपींची टोळी पोलिसांच्या हाती लागली. त्यापैकी दोघांना पोलिसांनी पकडले, तर इतर चारजण पोलिसांना चकमा देत फरार झाले.

Barshi police found a gang of six people along with robbery materials in the blockade


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बार्शी शहर पोलिसांनी  रविवार दि. ४ जून २०२३ रोजी बार्शी कुर्डूवाडी रस्त्यावर हायवे स्टॉप येथे नाकाबंदी लावली होती. तेथे वाहनांची कसून तपासणी करत असताना, रात्री पावणेनऊच्या दरम्यान  पिवळया रंगाचा पट्टा असलेली काळ्या रंगाची मारुती इको गाडी (क्र. एमएच-१४-सीसी-६९५७) च्या तपासणीमध्ये कटावण्या, तलवार, अॅडजस्ट पाना, स्क्रूड्रायव्हर, पक्कड, कटर, पट्टी पाने, हातमोजे, मास्क, कानटोप्या, जर्किन, मिरची पावडर इत्यादी साहित्यासह सहा इसम दरोडा टाकण्याच्या उद्देशाने एकत्रितपणे निघालेले आढळून आले. पोलिस त्यांना ताब्यात घेत असताना, चारजण पळून जाण्यात यशस्वी झाले, तर इतर दोघांना पोलिसांनी वाहन व साहित्यासह ताब्यात घेतले.

सांगली येथील दरोडा प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी बार्शी शहर पोलिसांनी बार्शी कुर्डूवाडी रस्त्यावर नाकाबंदी लावली होती.

१) आकाश महावीर काळे (वय २०) रा. रमा माता कॉलनी, माळीनगर, ता. माळशिरस व २) किशोर ज्ञानदेव माने (वय ३७) रा. राउतनगर, अकलूज, ता. माळशिरस या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे, तर ३) महादेव रंगनाथ पवार, ४) विनोद तानाजी काळे, ५) सुरेष नामदेव चव्हाण  (सर्व रा. सवतगाव, ता. माळशिरस ) व ६) दिलीप मोहन पवार, रा पांडूझरी, राज्य कर्नाटक हे चौघे फरार झाले आहेत.

पोकॉ. अजित महादेव वाघमारे यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली असून, पुढील तपास उपनिरिक्षक गजानन कर्णेवाड करत आहेत.

पो.नि. संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ. अजित महादेव वाघमारे, शरद दत्तू साळवी, राहुल राजाराम उदार, कुमार सर्जेराव माने यांनी ही कामगिरी पार पाडली.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)