३ तासात चोरीचा मुद्देमाल हस्तगत करुन बार्शी शहर पोलिसांनी महिला आरोपीस केली अटक

Admin
0

 

Barshi city police arrested the woman accused after seizing the stolen property within 3 hours

बार्शी विशेष : बार्शी बसस्थानकात बसमध्ये चढत असताना महिला प्रवाश्याच्या पर्समधील दागिने व रोख रक्कम चोरीस गेलेल्या गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल तीन तासात हस्तगत करण्यात बार्शी शहर पोलिसांना यश आले.

याबाबत माहिती अशी की, साधना श्रीकांत सुरवसे, रा. मांजरी बुद्रुक, कुंजीर वस्ती, पुणे या  पुण्यास जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना, अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील सोन्याचे मणी असलेली काळी पोत (अं.किंमत बारा हजार रुपये) व रोख आठ हजार रुपये पळविले. ही घटना दि. १० जून २०२३ रोजी सकाळी पावणे अकराचे सुमारास बार्शी बसस्थानकात घडली. या चोरीची फिर्याद त्यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली.

Barshi city police arrested the woman accused after seizing the stolen property within 3 hours


या चोरीचा तपास करत असताना, पोकॉ सचिन देशमुख यांना एका महिलेने त्यांच्या पिशवीतील पर्स काढल्याचे तांत्रिक तपासात दिसून आल्याने, बार्शी शहरात सदर महिलेचा शोध घेऊन महिला अंमलदाराकडून त्या संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले. महिला पंचासमक्ष घेतलेल्या अंगझडतीमध्ये सदर गुन्ह्यातील चोरलेला काळी पोत व रोख रक्कम असा वीस हजार रुपयांचा मुद्देमाल तिच्याकडे सापडल्याने तिला अटक करण्यात आली. अनिता संतोष पवार (वय २५), रा. पिंपळी, ता. पूर्णा जि. परभणी असे या अटक करण्यात आलेल्या महिलेचे नांव आहे.

सदर कामगिरी पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधिक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. संतोष गिरीगोसावी, सपोनि सुधीर तोरडमल, सपोनि ज्ञानेश्वर उदार, सपोउनि अजित वरपे व शैलेश चौगुले, अमोल माने, सचिन देशमुख, अविनाश पवार, रवि लगदिवे, अर्जुन गोसावी, डोईफोडे, साबळे यांनी पार पाडली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)