कवी कालिदास मंडळ, बार्शी आयोजित काव्य लेखन स्पर्धा

Admin
0

 

Poetry writing competition organized by Kavi Kalidas Mandal, Barshi

बार्शी विशेष : येथील कवी कालिदास मंडळाच्यावतीने, महाकवी कालिदास दिनाच्या औचित्याने कालिदास महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी २५ जून रोजी कालिदास महोत्सव संपन्न होणार असून या महोत्सवाच्या निमित्ताने बार्शी तालुक्यातील कवींना प्रोत्साहन देण्यासाठी स्वलिखित काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती  मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र इकारे यांनी दिली आहे.

गेली तीस वर्ष कवी कालिदास मंडळ साहित्याच्या क्षेत्रामध्ये कार्य करीत आहे. नवोदित कवींना प्रोत्साहन मिळावे या हेतूने ही स्वलिखित काव्य लेखन स्पर्धा आयोजित केली असून, विजेत्यांना पुढीलप्रमाणे पारितोषिक देण्यात येणार आहेत. प्रथम ५०० रुपये व प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह. द्वितीय ३०० रुपये व प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह. तृतीय २०० रुपये व प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह. उत्तेजनार्थ २ प्रत्येकी १०० रुपये व प्रमाणपत्र. 

तसेच सर्व सहभागी कवींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. वरील पारितोषिके मंडळाचे सहसचिव आबासाहेब घावटे यांच्यावतीने कै.मारूती त्रिंबक घावटे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणार आहेत.

ज्यांना यापूर्वी या स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले आहे त्यांना या स्पर्धेत भाग घेता येणार नाही.

तरी  बार्शी तालुक्यातील ज्या कवींना या स्पर्धेत सहभागी घ्यावयाचा आहे अशांनी आपल्या कविता दि. १५ जून पर्यंत २५ रुपये प्रवेश फी (प्रवेश फी फोन पे द्वारे पाठवावी. फोन पे नंबर९८९०८२९७७५) सह आबासाहेब घावटे यांच्याकडे मो. ९८९०८२९७७५ या  नंबरवर व्हाट्सअपवर पाठवाव्यात, असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण कवी कालिदास महोत्सवात करण्यात येईल.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)