बार्शीची चिन्मयी सोपल संगीत विशारद पुरस्काराने सन्मानित

Admin
0

 

Barshi's Chinmayi Sopal honoured with Sangeet Visharad Award

बार्शी विशेष : अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्यावतीने घेण्यात आलेल्या संगीत विशारद परीक्षेत, जगातील ८०० हून अधिक केंद्रामधून संवादिनी वादनात सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल, बार्शीच्या चिन्मयी गजानन सोपल हिला मंडळाच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

वाशी, मुंबई येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात, चिन्मयीला डॉ. अमी उपाध्याय कथक नृत्यांगना कुलगुरू डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठ अहम्मदाबाद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

लहानपणापासूनच संगीत शिक्षणाची आवड असलेल्या चिन्मयीने इयत्ता दुसरी पासून बार्शीच्या श्री दत्त गायन समाज येथे, हार्मोनियम वादनाचे धडे घेत संगीताच्या शिक्षणाचा श्रीगणेशा केला. यासाठी तिला संतोष शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमाप्रमाणे प्रतीवर्षी एक अशा एकूण सात परीक्षा देऊन तिने हार्मोनियममध्ये विशारद ही पदवी प्राप्त केली. तसेच पदवी शिक्षण घेत असताना विद्यापीठाच्या युवा महोत्सवात भाग घेऊन त्यामध्ये पण  पुरस्कार मिळविले. 

विद्यापीठाची दोन सुवर्णपदके, भौतिकशास्त्र व बीएससी मध्ये सर्वप्रथम येणाऱ्या चिन्मयीला संगीत विशारद पुरस्कार मिळाल्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)