बार्शीच्या गुन्हेगारी टोळीतील ६ जण जिल्ह्यातून २ वर्षे हद्दपार

Admin
0

 

6 members of the criminal gang of Barshi exiled from the district for 2 years

बार्शी विशेष : बार्शी शहर व तालुक्यात साथीदारांसोबत गुन्हे करुन दहशत व भय निर्माण करणारा सराईत गुन्हेगार विशाल रणदिवे व त्याच्या टोळीतील ५ साथीदारांना, सोलापूरचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता हद्दपार केले आहे. टोळीप्रमुख विशाल विठ्ठल रणदिवे तसेच टोळी सदस्य बाबा सुरेश खंडागळे, नारायण मच्छिंद्र लोखंडे, विनोद उर्फ विनायक श्रावण पवार, विक्रम रमेश पारडे (सर्व रा. झाडबुके मैदान, बार्शी) व नागेश उर्फ बक्शा हिरा गवळी (रा. लहुजी वस्ताद चैक, बार्शी) अशी त्यांची नावे आहेत.

विशाल रणदिवे व त्याच्या टोळीतील साथीदार

विशाल विठ्ठल रणदिवे याने बेकायदेशीररीत्या टोळी निर्माण करुन, एकट्याने व टोळीच्या साथीदारांसोबत गुन्हे करुन दहशत व भय निर्माण केले होते. या टोळीने बार्शी शहर व तालुका पोलीस ठाणे, तसेच पुणे जिल्ह्यामध्ये खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा टाकणे, अपरहरण करणे, खंडणी मागणे, गैरकायद्याची मंडळी जमवून दंगा करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे करुन समाजात दहशत पसरवली होती. त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करुन देखील सुधारणा न झाल्याने, त्याबाबत बार्शी शहर पोलीस ठाणे यांचेकडून  प्रस्ताव प्राप्त होता. 

हद्दपारीचे आदेश पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी पारित केले. सदरची कारवाई अप्पर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव, उप विभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. सुहास जगताप, पो.नि. संतोष गिरीगोसावी, सपोनि तोरडमल तसेच स्थानिक गुन्हे शाखा व बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)