तरुणावर सशस्त्र हल्ला; माजी नगरसेवकासह नऊ जणांवर गुन्हा दाखल

Admin
0

 

armed assault on youth; A case has been registered against nine people including a former councillor

बार्शी विशेष : तरुणावर सशस्त्र हल्ला करुन, जखमी करुन, चेन, अंगठी आणि रोख वीस हजार रुपयांचा ऐवज लुटल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात माजी नगरसेवकासह नऊ जणाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेची फिर्याद संजय विलास आरगडे (वय २८) रा. तावडी, ता. बार्शी यांनी बार्शी पोलिस ठाण्यात दिली आहे.

फिर्यादी हे सतीश आरगडे यांच्यासह तुळजापूर रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कमानीसमोरुन बसस्थानकाकडे जात असताना,  तू सूरज आरगडे यांचे भांडण का मिटवले याचा राग मनात धरुन माजी नगरसेवक रोहित लाकाळ, विजय साठे, दीपकराज कदम, सुमित कावळे, बालाजी पवार, वैभव म्हेत्रे, प्रसाद शेळके व अन्य दोन अनोळखी इसमांनी तलवार, लाकडी बॅट, दांडके, रॉडने हल्ला करुन जखमी केले, व दोन तोळे सोन्याची चेन, एक तोळा सोन्याची अंगठी तसेच वीस हजार रुपये काढून घेतले असे फिर्यादीत नमूद केले आहे. फिर्यादीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ही घटना ३ मार्च रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. सदर फिर्यादीवरुन बार्शी शहर पोलिस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)