आमच्या भांडणात का आलात म्हणून तरुणाला तलवारीच्या उलट्या बाजूने मारहाण

Admin
0

 

A young man who went to settle a quarrel was beaten with the reverse side of a sword

बार्शी विशेष : आमच्या भांडणात का आलात म्हणत तरुणाला तलवारीच्या उलट्या बाजूने मारहाण केल्याची घटना बार्शीतील टिळक चौक येथे घडली. याबाबतची फिर्याद अजय शाम पवार (वय २४) रा. टिळक चौक यांनी बार्शी पोलिस ठाण्यात दिली आहे.

फिर्यादीच्या घराशेजारी राहणारे नातेवाईक दादा तुपसमींदर व घराच्या पाठीमागे राहणारे राजा कनगिरे यांच्यामध्ये मोटरसायकलच्या कारणावरुन बाचाबाची सुरु होती. त्या भांडणाचा आवाज ऐकून फिर्यादी व त्याचे वडिल भांडण सोडविण्यासाठी गेले असता, तुम्ही आमच्या भांडणात का आलात असे म्हणून राजा कनगिरे याने शिवीगाळ करुन त्याच्या हातात असलेल्या तलवारीच्या उलट्या बाजूने फिर्यादीच्या हातावर व पायावर मारहाण केली, त्यामुळे फिर्यादीस मुक्का मार लागला. 

ही घटना दि. ४ मार्च रोजी रात्री सव्वानऊचे सुमारास घडली. पुढील तपास पो. हेड कॉन्स्टेबल डबडे करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)