पाईप, केबल कापून दोन भावांच्या विहीरीतील दोन मोटारी लंपास

Admin
0

 

Two motors in the well of two brothers were stolen by cutting a pipe & cable

बार्शी विशेष : दोन भावांच्या शेजारी असलेल्या शेतातील विहीरीतून दोन पाणबुडी मोटारी, पाईप, केबल कापून चोरट्यांनी लंपास केल्याची घटना बार्शी तालुक्यातील शेंद्री येथे घडली. या घटनेची फिर्याद जोतिराम भागवत शिंदे (वय ४८) रा. म्हाडा कॉलनी, गाडेगांव रोड, बार्शी यांनी दिली आहे.

बार्शी तालुक्यातील शेंद्री येथे फिर्यादी व त्यांचा चुलत भाऊ उध्दव संभाजी शिंदे यांची लगत शेती आहे. त्यामध्ये असलेल्या दोघांच्या विहीरीतील दोन पाणबुडी मोटारी, पाईप, केबल चोरीला गेल्या आहेत, अशी माहिती फिर्यादीच्या चुलत भावाने त्यांना फोन करुन सांगितली. 

त्यावेळी जाऊन शेतात पाहणी केली असता, दोघांच्याही विहीरीतील दोन पाणबुडी मोटारी, पाईप व केबल कापून चोरुन नेल्याचे त्यांना आढळून आले. ही घटना दि. १३ ते १६ मार्च रोजी सायंकाळी ६ ते सकाळी ९ चे दरम्यान घडली.

शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)