बार्शी विशेष : मुलीला एसटी मध्ये बसवून परत येईपर्यंत दुचाकी गायब झाल्याची घटना बार्शीच्या बस स्थानकामध्ये घडली. या बाबतची फिर्याद विनोद तुळशीदास गोरे (वय ४२) रा. धानोरे, ता. बार्शी यांनी शहर पोलिसांत दिली आहे.
दि. १९ मार्च रोजी मुलीला पुणे येथे जाण्यासाठी बसमध्ये बसवून देण्याकरिता गोरे त्यांच्या मोटरसायकल (क्र.एमएच-१२-एलएल-१२८५) वरुन मुलीसह बार्शी बसस्थानकावर आले होते.
त्यावेळी त्यांनी मोटरसायकल हँडल लॉक न करता सकाळी साडेअकराचे सुमारास बस स्थानकातून बस बाहेर जाणाऱ्या गेटच्या आतील बाजूला उभी केली होती. मुलीला सोडून दुपारी १२ चे सुमारास मोटरसायकल उभी केलेल्या ठिकाणी ते परत येईपर्यंत त्यांची मोटरसायकल चोरीला गेल्याचे दिसून आले.
बार्शी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोना पवार करत आहेत.
