बार्शी विशेष : बार्शी शहरातून दोन वेगवेगळ्या घटनेत, दोन जेष्ठ नागरिकांच्या, दोन दुचाकी चोरीला गेल्याच्या तक्रारी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
पहिल्या घटनेत, बार्शीतील कापड व्यापारी भगवान मन्मथ करजखेडे (वय ७२) रा. आडवा रस्ता, बार्शी यांनी नेहमीप्रमाणे रात्री ११ चे सुमारास हँडल लॉक करुन घरासमोर लावलेली हिरो पॅशन मोटरसायकल (क्र.एमएच-१३-एयू-३७२३) ही चोरट्याने रात्रीतून चोरुन नेली. ही घटना दि. ८ ते ९ मार्च रोजी रात्री ११ ते पहाटे ३ चे दरम्यान घडली.
तर दुसऱ्या घटनेत, बार्शीत लोकल कुरिअर व महावीर धर्मार्थ दवाखान्यात सुपरव्हिजनचे काम करणारे, दिलीप नरहर मैंदरकर (वय ७२) रा. बारंगुळे गल्ली, कसबा पेठ, बार्शी यांची, महावीर धर्मार्थ दवाखान्याच्या शेजारी असलेल्या हातपंपाजवळ रात्री ८ वाजता लावलेली हिरो डिलक्स मोटरसायकल (क्र.एमएच-१३-सीएन-८४८९) दवाखाना बंद करुन ८.२५ वाजता बाहेर येईपर्यंत चोरट्याने पळवली. ही घटना दि. ९ मार्च रोजी रात्री ८ ते ८.२५ चे दरम्यान घडली.
या दोन्ही तक्रारींची नोंद बार्शी शहर पोलिस ठाण्यात झाली असून, दुसऱ्या घटनेचा तपास पोहेकॉ माने करत आहेत.
