वॉटर चिलर मशीन गेली चोरीला; दोन अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल

Admin
0

 

The water chiller machine was stolen; A case has been registered against two unknown thieves

बार्शी विशेष : घराजवळील खुल्या जागेत ठेवलेली आरओ वॉटर चिलर मशीन दोन अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना बार्शीतील तुळशीराम रोड येथे घडली. या घटनेची फिर्याद सुमेध सुनिल गोलकोंडा (वय २६) रा. तुळशीराम रोड, बार्शी यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.

सुमेध यांच्या चुलत्यांनी व्यवसायासाठी घेतलेले आरओ वॉटर फिल्टर, चिलींग मशीन व साहित्य, निधनानंतर व्यवसाय बंद असल्यामुळे,  त्यांच्या घराजवळील खुल्या जागेत ठेवलेले होते. 

दि. ११ मार्च रोजी सकाळी १० चे सुमारास ते साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यामुळे तेथे जाऊन पाहिले असता, त्यापैकी आरओ वॉटर चिलर मशीन दिसून आली नाही. त्या दिवशी पहाटे ३ चे सुमारास आवाज आल्यामुळे गॅलरीत येवून पाहिले असता, दोन इसम चिलर मशीन घेऊन जाताना दिसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)