घरी अभ्यास करत बसलेली अल्पवयीन मुलगी रात्रीतून बेपत्ता

Admin
0

 

A minor girl who was studying at home went missing during the night

बार्शी विशेष : घरी अभ्यास करत बसलेली अल्पवयीन मुलगी रात्रीतून बेपत्ता झाल्याची तक्रार वैराग पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. 

नेहमीप्रमाणे जेवण झाल्यानंतर मुलीची आई रात्री १० वाजता झोपी गेली, त्यावेळी ही मुलगी अभ्यास करत होती. दुसऱ्या दिवशी शेतात लवकर जाण्यासाठी तिची आई पहाटे ३ च्या सुमारास उठली, तेव्हा मुलगी घरात दिसून आली नाही. मी रात्री ११ वाजेपर्यंत अभ्यास करत होते तोपर्यंत ती जागीच होती असे दुसऱ्या मुलीने आईला सांगितले. 

सर्वांनी मिळून तिचा नातेवाईकांकडे तसेच सर्वत्र शोध घेतला पण ती सापडली नाही. त्यामुळे तिला अनोळखी इसमाने फूस लावून पळवून नेल्याची खात्री पटल्यामुळे, तिच्या आईने वैराग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. ४ मार्च रोजी रात्री ११ ते ५ मार्चच्या पहाटे ३ चे दरम्यान घडली.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)