लघुशंका करुन येईपर्यंत चोरट्याने दुचाकी पळवली

Admin
0

 

The thief ran the bike until he urinated

बार्शी विशेष : लघुशंका करुन येईपर्यंत दुचाकी चोरीला गेल्याचा प्रकार श्रीपत पिंपरी फाटा येथे घडला. याची तक्रार परमेश्वर धनाजी निकम (वय ४० ) रा.भोईंजे (सध्या रा. जैन मंदिरजवळ, गुंड प्लॉट, बार्शी) यांनी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात दिली आहे.

दि. १३ मार्च रोजी रात्री आठचे सुमारास भोईंजे येथील शेतातून घरी येत असताना, निकम हे कुर्डुवाडी बार्शी रस्त्यावरील श्रीपत पिंपरी फाटा येथे मोटरसायकल (क्र. एमएच-१३-बीयु-२३६२) ही रस्त्याच्या कडेला उभी करुन थोड्या अंतरावर अंधारात लघुशंका करण्यासाठी गेले होते. ती संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांची मोटरसायकल पळवून नेली.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)