शहरातील मुख्य बाजारपेठेतून भरदिवसा मोटरसायकलची चोरी

Admin
0

The theft of a motorcycle in broad daylight from the city's main market

बार्शी विशेष : शहरातील मुख्य कापड बाजारपेठेत असलेल्या कोष्टी गल्ली येथून भरदिवसा मोटरसायकल चोरीस गेल्याची तक्रार बार्शी शहर पोलिसात दाखल झाली आहे.

अज्ञात चोरट्याने बार्शीतील कोष्टी गल्ली येथील राहत्या घरासमोर हँडल लॉक करून लावलेली मोटरसायकल (क्र.एमएच-१३-सीपी-४३८७) पळवून नेली. ही घटना दि. २४ फेब्रुवारी रोजी दुपारी १ ते ३ च्या दरम्यान घडली. 

सर्वत्र शोध घेतल्यानंतर, दि. २८ फेब्रुवारी रोजी याबाबतची फिर्याद ओंकार आनंद नांदेडकर (वय २२) रा. कोष्टी गल्ली, बार्शी यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली असून, पुढील तपास सपोनि तोरडमल करत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)