टेंपोने ठोकरल्याने महिलेचा मृत्यु; गाडेगांव बायपास चौकातील घटना

Admin
0

 

Woman dies after being hit by a tempo; Incident at Gadegaon Bypass Chowk
रूपाली गायकवाड

बार्शी विशेष : पायी चालत जाणाऱ्या महिलेला व मुलाला टेंपोने ठोकरल्याने महिलेचा मृत्यु झाला. रूपाली गायकवाड असे मृत्यु पावलेल्या महिलेचे नांव आहे. ही घटना रविवार दि. २६ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास गाडेगांव बायपास चौक येथे घडली. धनंजय रामचंद्र गायकवाड (वय ४४) रा.उपळाई रोड, शेंडगे प्लॉट, बार्शी यांनी याबाबतची फिर्याद बार्शी तालुका पोलिस ठाण्यात दिली आहे.

धनंजय गायकवाड हे पत्नी व दोन मुलांसह जवळा येथे जाण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. पेट्रोल भरण्यासाठी पत्नी रूपाली (वय ३७) व मुलगा अथर्व (वय १४) यांना गाडेगांव चौकात थांबवून, ते पेट्रोल पंपावर मुलगा वेदांत (वय ११) याच्यासह गेले.

पेट्रोल भरून पुन्हा गाडेगांव चौकात आल्यानंतर, त्यांना पत्नी व मुलगा गाडेगांवच्या दिशेने रस्त्याच्या डाव्या बाजूने पायी चालत जाताना दिसले. त्याचवेळी भरधाव वेगाने गाडेगांवकडे जाणाऱ्या एका मिनी टेंपोने (क्र. केए-४४-ए-१८४९) त्यांच्या पत्नी व मुलास पाठीमागून जोराची धडक दिली.

गंभीर जखमी अवस्थेतील पत्नीस त्यांनी लोकांच्या मदतीने एका वाहनातून बार्शीतील एका खासगी इस्पितळात उपचाराकरिता आणले असता, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्या मयत झाल्याचे घोषीत केले.

टेंपोचालकाचे नांव जयण्णा असून पोलिसांनी त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)