बार्शी विशेष : दुकानासमोर लावलेला पिकअप चोरट्याने रात्रीतून चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबतची फिर्याद चांगदेव पांडुरंग डावकरे (वय २६) रा. रामेश्वर मंदीर, कुर्डूवाडी रस्ता, बार्शी यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.
डावकरे यांनी त्यांचा महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र.एमएच-१३-एएक्स-८८२८) बार्शीतील शहा मामा जैन स्टोन डेपो यांच्या दुकानासमोर लावलेला होता. सकाळी पिकअप लावलेल्या ठिकाणी गेल्यानंतर, अज्ञात चोरट्याने रात्रीतून तो चोरुन नेल्याचे दिसून आले. ही घटना दि. २४ ते २५ मार्च रोजी रात्री ८ ते सकाळी ९ चे दरम्यान घडली.
