बार्शी बस स्थानकात वाहतूकीस अडथळा करणाऱ्या रिक्षावर कारवाई

Admin
0

 

Action taken against rickshaws obstructing traffic at Barshi bus stand

बार्शी विशेष : बार्शी बस स्थानकात रहदारीस व वाहतूकीस अडथळा येईल अशाप्रकारे रिक्षा उभी करणाऱ्या रिक्षावर वाहतूक पोलिसांनी कारवाई करत चालकांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

रामचंद्र कोंडीबा पोकळे (क्र.एमएच-१३-बीव्ही-१३०४), अतिक अनिस शेख (क्र.एमएच-१३-सीटी-८२६४), शेखर अनंता घाडगे (क्र.एमएच-१३-सीटी-९४९०), सचिन राजू पेदे (क्र.एमएच-१३-सीटी-५१८४) सर्वजण रा. बार्शी, यांचे विरोधात बार्शी शहर पोलिस ठाण्यात भा.दं.वि. १८६० कलम २८३ नुसार गुन्हे दाखल केले आहेत. रविवार दि. २६ मार्च २०२३ रोजी दुपारी १२ ते १ चे दरम्यान ही कारवाई करण्यात आली.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)