बार्शी कुर्डूवाडी रस्त्यावर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

Admin
0

 

A bike rider died on the spot in an accident on Barshi Kurduwadi road

बार्शी विशेष : ट्रक चालकाने अचानक ट्रक डाव्या बाजूस घेतल्याने समोरुन येणाऱ्या मोटरसायकलशी धडक होवून दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात बार्शी कुर्डूवाडी रस्त्यावरील हॉटेल वैशाली जवळ घडला. चंद्रकांत ज्ञानोबा गिराम, रा. गोपेगांव, ता. पाथरी, जि. परभणी असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

बार्शी कुर्डूवाडी रस्त्यावर दि. २४ मार्च २०२३ रोजी दुपारी सव्वाचारचे सुमारास ट्रक चालक उत्तम गोविंद मसलकर, रा. शिरपूर, ता. मोहोळ यांनी चालवत असलेला ट्रक (क्र.एमएच-०४-ईएल-३९९१) अचानक रस्त्याच्या डाव्या बाजूस घेतल्याने समोरुन येत असलेल्या मोटरसायकलशी (क्र.एमएच-२०-एपी-८४५६) धडक होऊन दुचाकीस्वार चंद्रकांत ज्ञानोबा गिराम हे गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यु झाला. या घटनेची फिर्याद संदीप बाबासाहेब गुंड, रा. होळकर बागेजवळ, शिवाजीनगर, बार्शी यांनी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात दिली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)