पत्नीविषयी संशय घेऊन शेजाऱ्यास दगड मारून जखमी केले

Admin
0

 

Suspecting his wife, he injured his neighbor by pelting stone

बार्शी विशेष : शेजाऱ्याने त्यांच्या पत्नीबद्दल संशय घेऊन माझ्या डोक्यात दगड मारून जखमी केले, अशी फिर्याद सुरेश शिवराम चंदनशिवे (वय ५८) रा. शिराळे ता. बार्शी यांनी पांगरी पोलिस ठाण्यात दिली आहे. 

फिर्यादीच्या शेजारी राहणाऱ्याने त्यांच्या पत्नीबद्दल फिर्यादीबाबत संशय घेऊन शिवीगाळ सुरू केली. तेव्हा विनाकारण संशय घेऊ नको आणि शिवीगाळी करु नको शेजाऱ्यास म्हणताच, पुन्हा शिवीगाळ करुन तेथे पडलेला दगड उचलून माझ्या डोक्यात मारून जखमी केले असे पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना २ मार्च रोजी सकाळी साडे आठचे सुमारास घडली.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)