बार्शी विशेष : घरासमोरील गेटच्या आत हँडल लॉक करुन लावलेली मोटरसायकल चोरट्याने रात्रीतून पळवली. बार्शी तालुक्यातील कव्हे येथे ही घटना घडली.
याबाबतची फिर्याद विकास नामदेव जाधव (वय २६) रा. कव्हे, ता. बार्शी यांनी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी होंडा एक्स ब्लेड मोटरसायकल (क्र. एमएच-१३-डीके-३८१५) ही घरासमोरील गेटच्या आत हँडल लॉक करुन लावली होती. दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांचे वडिल शेतात जाण्यासाठी उठून घराबाहेर आले तेव्हा त्यांना गेट उघडे दिसले व मोटरसायकलही दिसून आली नाही. ही घटना २८ फेब्रुवारी २०२३ ते १ मार्च रोजी रात्री ११ ते पहाटे ४ चे दरम्यान घडली.
