चुलत्यासोबत चाललेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पुतण्याला मारहाण

Admin
0

 

Beating the nephew who went to settle the quarrel with his uncle

बार्शी विशेष : हॉटेलची चहाची उधारी मागण्यावरुन चुलत्यासोबत सुरु असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पुतण्याला हॉटेल मालकाने दगडाने आणि दुधाच्या कॅनने मारून जखमी केल्याची घटना इर्ले येथे घडली. माऊली नागनाथ वायकुळे (वय २१) रा. इर्ले, ता. बार्शी यांनी वैराग पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. 

फिर्यादी गावातील डेअरीत दूध  वाढून तेथे थांबले होते. त्यावेळी त्यांचे चुलते काशिनाथ दत्तू वायकुळे हे पण तेथे दूध वाढण्यासाठी आले. तेव्हा डेअरी शेजारी असलेले हॉटेलचे मालक अविनाश कारंडे व राजेंद्र कारंडे हे, काशिनाथ वायकुळे यांना हॉटेलची चहाची उधारी मागण्यावरुन गच्ची धरुन, शिवीगाळी करत मारहाण करु लागले. म्हणून त्यांच्यातील वाद सोडविण्यासाठी फिर्यादी तेथे गेले असता, अविनाश कारंडे यांनी दुधाचे प्लॅस्टिकचे कॅन उचलून फिर्यादीस मारले, ते डोळ्याजवळ लागल्यामुळे फिर्यादी खाली बसत असतानाच, परत अविनाश याने रस्त्याच्या कडेला पडलेला दगड डोक्यात मारून जखमी केले. असे माऊली वायकुळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना २ मार्च रोजी सकाळी दहाचे सुमारास घडली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)