महावितरणच्या स्टोअररुम मधून अडीच लाखांचे साहित्य गेले चोरीला

Admin
0

 

Material worth two and a half lakhs was stolen from the storeroom of Mahavitaran

बार्शी विशेष : महावितरण कार्यालय, बार्शी ग्रामीण उपविभागाचे व डिव्हिजन कार्यालयाचे स्टोअररुम येथील सिमेंट पत्रा फोडून व खिडकी उचटकटून अडीच लाख रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबतची फिर्याद राजू गणपत कदम (वय ५६) रा. राजस्व नगर, विजापूर रोड, सोलापूर (हल्ली रा. जावळी प्लॉट, बार्शी) यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.

राजू कदम हे महावितरण कार्यालय, बार्शी ग्रामीण उपविभागात मुख्य तंत्रज्ञ पदावर कार्यरत असून, त्यांच्या कार्यक्षेत्रात स्टोअररुम येते. दि. ७ फेब्रुवारी २०२३ रोजी लाईनमन सागर माळी यांनी हळदुगे येथील कामासाठी ६ किटकॅटची मागणी केल्यामुळे, त्याचेसोबत स्टोअररुमचे कुलूप उघडून आत गेल्यानंतर रेकॉर्डवरील उपलब्ध किटकॅट स्टोअररुम मध्ये दिसून आले नाहीत. तसेच उपविभागाचे स्टोअररुम व  डिव्हीजन कार्यालयचे स्टोअररुम यामधील सामाईक सिमेंट पत्रा फुटल्याचे दिसून आले. 

त्यामुळे अरविंद भाग्यवंत व डिव्हिजन कार्यालय, बार्शीचे मुख्य तंत्रज्ञ बाळासाहेब सुरवसे यांचेशी संपर्क साधून, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांसह पाहणी केली असता, डिव्हिजन कार्यालयाचे स्टोअररुम कडील बाजूची खिडकी उचकटलेली दिसली. त्यामुळे दोन्ही स्टोअररुम मध्ये चोरी झाल्याचे लक्षात आले. 

यामध्ये १०० एएमपी क्षमतेचे किटकॅट कटआऊट २०० नग, २०० एएमपी क्षमतेचे किटकॅट कटआऊट १०० नग आणि डिव्हिजन कार्यालयाकडील खराब स्क्रॅप बॅटरी ७५ नग असा एकूण २,५३,२०० रुपये किंमतीचे साहित्य चोरीला गेल्याचे दिसून आले.

दि. ७ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०.३० चे पूर्वी डिव्हिजन कार्यालयीन कंपाऊंडच्या आवारातील पत्राशेडच्या गोडावूनची खिडकी उचकटून वरीलप्रमाणे साहित्य चोरीस गेले असे दि. २३ मार्च २०२३ रोजी देण्यात आलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)