बार्शी लातूर रस्त्यावरील कडबा मार्केटजवळून दुचाकी चोरीला गेली

Admin
0

 

A bike was stolen from near Kadaba Market on Barshi Latur Road

बार्शी विशेष : बार्शी लातूर रस्त्यावरील कडबा मार्केटजवळून दुचाकी चोरीला गेली. याबाबची फिर्याद दिलीप किसन धालगडे (वय ६४) रा. कदम वस्ती, तुळजापूर रोड, बार्शी यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.

बार्शी लातूर रस्त्यावर असलेल्या कडबा मार्केटमध्ये फिर्यादी कडबा खरेदीसाठी गेले, त्यावेळी त्यांनी त्यांची मोटरसायकल (क्र.एमएच-२५-एएच-४२५७) ही कडबा मार्केटच्या बाजूला मोकळ्या जागेत हँडल लॉक करुन उभी केली होती. कडबा मार्केट मधील काम आटोपून दुचाकी उभी केलेल्या ठिकाणी ते आले असता, ती चोरीला गेल्याचे दिसून आले. ही घटना दि. १९ मार्च २०२३ रोजी सकाळी १० ते दुपारी १.३० या दरम्यान घडली.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)