बार्शी विशेष : सोनारी येथून देवदर्शन करुन परांडा मार्गे बार्शीकडे येत असताना, लक्ष्याचीवाडी गावाजवळ झालेल्या अपघात प्रकरणी वाहनचालक ऋषीकेश पांडुरंग पाटील, रा. दहिफळ, ता. कळंब, जि. धाराशिव याचेविरुध्द बार्शी तालुका पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
दि. २० मार्च २०२३ रोजी सोनारी येथून देवदर्शन करुन परांडा मार्गे बार्शीकडे येत असताना, लक्ष्याचीवाडी गावाजवळ इनोव्हा (क्र.एमएच-१३-डीई-०२००) कार चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटून, कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या कॅनालमध्ये पडून अपघात झाला होता.
या अपघातात कारमधून प्रवास करणारे लोक व चालक जखमी झाले होते. त्यापैकी अभ्युदय उर्फ शशीन अमरसिंह देशमुख या लहान मुलाचा दि. २१ मार्च २०२३ रोजी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला होता.
याबाबत बार्शी तालुका पोलिसांनी तपास करुन, वाहनचालक ऋषीकेश पांडुरंग पाटील याने त्याच्या ताब्यातील वाहन अविचाराने, हयगयीने, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन, भरधाव वेगाने चालवून, रस्त्याच्या कडेला असलेल्या कॅनालमध्ये पडून, अपघात करुन, वाहनातील प्रवाश्यांना गंभीर जखमी होण्यास व उपचारादरम्यान लहान मुलाचा मृत्यु होण्यास कारणीभूत झाला, म्हणून त्याचे विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
