बार्शी विशेष : १० वी च्या परिक्षेचा पेपर द्यायला जाते असे सांगून गेलेली विद्यार्थीनी बार्शी शहरातून बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे.
बार्शीतील एका हायस्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली ही अल्पवयीन मुलगी, दि. २ मार्च २०२३ रोजी सकाळी १० च्या सुमारास परिक्षा देण्यास जाते असे सांगून घरातून बाहेर पडली. त्यानंतर १०.४५ वाजता मुलीच्या आईला हायस्कूलमधील शिक्षकांनी फोन करुन तुमची मुलगी परिक्षेला आली नसल्याचे सांगितले.
तेव्हा मुलीच्या आईने तातडीने हायस्कूल गाठून तिचा शोध घेतला, तसेच शहर व परिसरात सर्वत्र शोध घेतला, सगळ्या नातेवाईकांकडेही चौकशी केली पण तिच्याबद्दल काही माहिती मिळाली नाही तसेच मुलगीही मिळून आली नाही. त्यावरून तिला कोणीतरी अनोळखी व्यक्तीने, अज्ञात कारणावरून पळवून नेल्याची खात्री पटल्यामुळे, मुलीच्या आईने बार्शी शहर पोलिसात तक्रार दिली असून अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
