जोरात हॉर्न वाजवून ओरडू नका म्हणणाऱ्या युवकाच्या चेहऱ्यावर चाकूने वार

Admin
0

 

A young man who said don't shout loudly was stabbed in the face with a knife

बार्शी विशेष : दुचाकीवरुन जोरात हॉर्न वाजवत, ओरडत गल्लीतून चाललेल्या दोघांना, ओरडू नका, माणसे झोपली आहेत असे म्हणणाऱ्या युवकाच्या चेहऱ्यावर चाकूने वार केल्याची घटना बार्शीतील नाळे प्लॉट येथे घडली.

दि. ४ मार्च रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास नाळे प्लॉट येथे राहणारे निहाल युसुफ शेख, जिशान तांबोळी व त्याचे वडिल जावेद तांबोळी व इरफान उस्मान पठाण असे चौघेजण जेवण झाल्यानंतर तांबोळी यांच्या घरासमोरील कट्ट्यावर बोलत बसले होते.

त्यावेळी दोघे अनोळखी तरुण मोटरसायकलचा हॉर्न जोराने वाजवत मोठ्याने ओरडत जात होते. मोठ्याने हॉर्न वाजवून जोरात का ओरडता, गल्लीतील माणसे झोपली आहेत, असे निहाल शेख म्हणाल्यामुळे त्या दोघांनी त्यांचेजवळ येऊन, तू आत्ता आम्हाला काय म्हणालास, तुला लई माज आलाय का असे विचारले. 

त्यावेळी निहालने त्यांना नाव विचारले असता, रोहन सुपेकर व ओंकार पेठाडे (दोघे रा. यशवंतनगर) अशी नावे सांगून, तुला काय करायचे आमच्या नावाचे म्हणत, रोहनने खिशातील चाकू काढून निहालच्या उजव्या डोळ्याचे भुवईवर व नाकाच्या उजव्या बाजूला मारला. निहाल सोबतच्या तिघांनी भांडण सोडवून त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. असा फिर्यादी जबाब निहाल युसुफ शेख (वय २२) रा. नाळे प्लॉट, बार्शी यांनी बार्शी पोलिसांना दिला आहे. पुढील तपास पो. उपनिरिक्षक सिरसाट करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)