कुत्रा मालकीच्या वादातून मारहाण; बार्शीच्या पांडे चौकातील घटना

Admin
0

 

Beaten up over dog ownership dispute; The incident at Pandey Chowk in Barshi

बार्शी विशेष : कुत्रा मालकीच्या वादातून दोघांना मारहाण करुन, लोखंडी कोयता घेऊन धावून येण्याचा प्रकार पांडे चौकातील पान दुकानसमोर रविवारी सायंकाळी घडला. प्रशांत दिलीप सुरवसे (वय २९) रा. राऊत गल्ली, कसबा पेठ, बार्शी यांनी यासंदर्भात बार्शी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

प्रशांत सुरवसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवार दि. २६ मार्च २०२३ रोजी सायंकाळी सव्वासातचे सुमारास मी, सुयश राऊत यांचे कुत्रे सोबत घेऊन दुचाकीवरुन  आम्ही दोघे पांडे चौकातील लकी पान दुकानासमोर आलो. त्यावेळी आमच्या ओळखीचा यश नागेश महिमाने (रा. आशा टॉकीज जवळ, बार्शी) हा आमचेजवळ आला व तुझ्याजवळ असलेले कुत्रे माझे आहे असे सुयशला म्हणू लागला. तेव्हा मी ते कुत्रे श्रेयस शिंदेकडून विकत घेतले आहे असे सुयश म्हणताच, ते कुत्रे माझेच आहे, ते मला देतो की नाही असे म्हणून शिवीगाळी करु लागला. मी सोडवासोडवी करत असताना त्याने आम्हा दोघांना लाथाबुक्क्याने मारहाण केली. तसेच तुम्हाला लय माज आलाय, थांबा बघतोच म्हणून आशा टॉकीजच्या दिशेने पळत जाऊन लोखंडी कोयता हातात घेऊन आमच्या दिशेने पळत येताना दिसल्यामुळे आम्ही तेथून पळून गेलो. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)