बार्शी विशेष : घरासमोर लावलेली अॅक्टीव्हा दुचाकी रात्रीतून चोरीला गेली. या बाबतची फिर्याद तेजपाल चंदूलाल गुंदेचा (वय ३६) रा. राऊळ गल्ली, मल्लाप्पा धनशेट्टी रोड, बार्शी यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.
फिर्यादीच्या वडिलांनी त्यांच्या वापराकरिता घेतलेली अॅक्टीव्हा दुचाकी (क्र.एमएच-१३-सीजी-७३६७) ही नेहमीप्रमाणे मल्लाप्पा धनशेट्टी रोड येथील राहत्या घरासमोर हँडल लॉक लाऊन रात्री उभी केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून घराबाहेर आल्यानंतर ती तेथे दिसून आली नाही, तसेच सर्वत्र शोध घेऊनही सापडली नाही. ही घटना दि. २८ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० ते १ मार्च रोजी सकाळी ६ चे दरम्यान घडली.
