बार्शी विशेष : पुण्यातील तरुणाने, गावी येताना आणलेली भावाची दुचाकी चोराने पळवल्याची घटना बार्शी तालुक्यातील साकत येथे घडली. याबाबतची तक्रार जयवंत नंदकुमार मोटे (वय २७) रा. साकत, ता. बार्शी यांनी वैराग पोलिस ठाण्यात दिली आहे.
पुण्यात वास्तव्यास असलेल्या जयवंत यांनी लग्नासाठी गावी येताना, त्यांच्या भावाची होंडा युनिकॉर्न मोटरसायकल (क्र.एमएच-१४-जेजे-७७०८) १० दिवसांपूर्वी आणली होती. ती राहत्या घरासमोरील मोकळ्या जागेत लावत होते.
दि. २४ मार्च २०२३ रोजी रात्री झोपण्यापूर्वी साडेदहाचे सुमारास नेहमीप्राणे मोटरसायकल हँडल लॉक करुन घरासमोर लावली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता त्यांच्या आईने उठवून मोटरसायकल दिसत नसल्याचे सांगितले. त्यावेळी आजूबाजूस शोध घेऊनही ती न सापडल्यामुळे चोरीला गेल्याची खात्री पटली.
तसेच दुचाकीचा शोध घेत असताना, गावाजवळ राहणारे गोविंद पंडित काळे, रा. घाणेगांव हे घराबाहेर ओट्यावर झोपले असताना, त्यांनी डोक्याजवळ ठेवलेला मोबाईल चोरीला गेला असल्याचे समजले असेही फिर्यादीत नमूद केले आहे.
