बार्शीतून दुचाकी चोरीला जाण्याच्या दोन घटना

Admin
0

Two incidents of bike theft from Barshi

बार्शी विशेष : बार्शी शहरातून दुचाकी चोरीला जाण्याच्या दोन घटना घडल्या. पहिल्या घटनेत घरासमोर लावलेली मोटरसायकल (क्र. एमएच-१३-बीके-८५८७) दि. १६ फेब्रुवारी रात्री ११ ते दि. १७ फेब्रुवारी सकाळी ६ च्या दरम्यान अज्ञात इसमाने चोरून नेल्याची फिर्याद अरिफ नजिर पठाण (वय २७) रा. मेहंदी नगर, परांडा रोड, बार्शी यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.

तर दुसऱ्या घटनेत, मित्राकडून घेतलेल्या मोटरसायकलवरून (क्र. एमएच-२३-एव्ही-९४८१) शेलगांव व्हळे येथील काम करून परत येत असताना, बार्शी बायपास रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेल्यावर, हॉटेलबाहेर उभी केलेली मोटरसायकल जेवण करून बाहेर येईपर्यंत अज्ञात चोराने चोरून नेली. ही घटना दि. १९ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद सतीश तुकाराम रोकडे (वय ३५) रा. रोहतवाडी, ता. पाटोदा, जि. बीड (सध्या रा. इंद्रेश्वर कारखाना उपळाई (ठों), ता. बार्शी यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)